Mumbai: तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रो सेवा विस्कळीत; प्रवाशांचा स्थानकापर्यंत रुळांवरून प्रवास!

0
14
Mumbai: तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रो सेवा विस्कळीत; प्रवाशांचा स्थानकापर्यंत रुळांवरून प्रवास!


Mumbai Borivali Metro News: बोरिवलीमधील एकसर आणि मंडपेश्वर स्थानकांदरम्यान आज सकाळी मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई मेट्रो सेवा विस्कळीत झाली, अशी माहिती मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच एमएमआरडीएने दिली. एमएमआरडीएने त्वरीत तांत्रिक बिघाड दूर केला आणि मेट्रो सेवा पूर्ववत करण्याचे अश्वासन दिले. मात्र, अचानक रस्त्यामध्ये मेट्रो बंद झाल्याने प्रवाशांना स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी चक्क रुळांवरून चालत जावे लागले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



Source link