Mumbai: ऑनलाईन जेवणात आढळला मेलेला उंदीर आणि झुरळ; विषबाधा झाल्यानं तरुण रुग्णालयात दाखल!

0
35
Mumbai: ऑनलाईन जेवणात आढळला मेलेला उंदीर आणि झुरळ; विषबाधा झाल्यानं तरुण रुग्णालयात दाखल!


राजीव शुक्ला असे रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजीव शुक्ला हे वकील असून काही दिवसांपूर्वी मुंबईत दाखल झाले. त्यांनी ८ जानेवारी वरळी येथील बार्बेक्यू नेशन येथून जेवणाची ऑर्डर दिली. मात्र, त्यांच्या जेवणात मेलेले उंदीर आणि झुरळ आढळून आले. या अन्नातून त्यांना विषबाधा झाली. त्यानंतर त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी नागपाडा पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र, पोलिसांनी अद्याप त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही, अशी माहिती राजीव शुक्ला यांनी ट्विटरद्वारे दिली.



Source link