
एएनआय वृत्तसंस्थेने कस्तुरबा पोलीस पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “मुंबईतील बोरिवली परिसरात राहणाऱ्या रेखा सोलंकी (वय, ४६) नावाच्या महिलेने पोटच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत मृत मुलीच्या वडिलांनी कस्तुरबा पोलिसांत फिर्याद दिली. मुलीचा मृतदेह जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेविरुद्ध आयपीसी कलम ३०२ आणि ३०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.”







