Mumbai: अल्पवयीन मुलीचा हात धरून म्हणाला ‘आय लव्ह यू’; कोर्टानं तरुणाला सुनावली दोन वर्षांची शिक्षा

0
29
Mumbai: अल्पवयीन मुलीचा हात धरून म्हणाला ‘आय लव्ह यू’; कोर्टानं तरुणाला सुनावली दोन वर्षांची शिक्षा


मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सप्टेंबर २०१९ मधील आहे. पीडित मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, पीडित मुलगी जवळच्या दुकानातून चहापती आणायला गेली होती. मात्र, ती घरी रडत परतली. याबाबत पीडितेच्या आईने तिच्याकडे विचारपूस केली असता तिने सांगितले की, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या एका मुलाने तिचा हात धरुन तिला ‘आय लव्ह यू’ म्हटले. यानंतर पीडिताची आई जाब विचारण्यासाठी आरोपीकडे गेली. त्यावेळी आरोपीने असा दावा केला की, त्याचे पीडितासोबत प्रेमसंबंध असून घटनेच्या दिवशी तिनेच त्याला भेटायला बोलवले होते.



Source link