
Mumbai News: मुंबईच्या वरळीतील एका इमारतील भीषण आग लागल्याची अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देणे तरुणाच्या अंगलट आली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी ३३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. संबंधित तरुणाने दारूच्या नशेत अग्निशमन दलाला फोन केल्याचे समजत आहे. इमारतील लोकांना त्रास देण्यासाठी त्याने अग्निशमनदलाला फोन केल्याचे पोलिसांनी सांगितले.





