Morrya Movie: सफाई कर्मचाऱ्यांची भावस्पर्शी कथा; पुरस्कार विजेता ‘मोऱ्या’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

0
12
Morrya Movie: सफाई कर्मचाऱ्यांची भावस्पर्शी कथा; पुरस्कार विजेता ‘मोऱ्या’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार!


Morrya Movie Release Date: मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक प्रयोग होत आहे. तर, मराठी चित्रपटांना जगभरात ओळख मिळत आहे. असाच एक पुरस्कार विजेता चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लंडन येथील ‘सोहोवाला कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा’ या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये पहिल्यांदा प्रीमियर शो करण्याचा मान ‘मोऱ्या’ या मराठी चित्रपटाने मिळवून, युरोपमधील प्रेक्षकांची हाऊसफुल्ल पसंती मिळवली आहे. कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मोऱ्या’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा पासूनच या चित्रपटाविषयी कुतूहल वाढू लागले होते. आता नव्या वर्षात येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.



Source link