Modi 3.0 | नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ; राष्ट्रपती भवनात सायंकाळी पार पडणार शपथविधी सोहळा | Navarashtra (नवराष्ट्र)

0
15
Modi 3.0 | नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ; राष्ट्रपती भवनात सायंकाळी पार पडणार शपथविधी सोहळा | Navarashtra (नवराष्ट्र)


नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ; राष्ट्रपती भवनात सायंकाळी पार पडणार शपथविधी सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना अद्याप निमंत्रण मिळालेले नसून, निमंत्रण मिळाल्यानंतर त्याबाबत विचार केला जाईल, असे काँग्रेसने शनिवारी सांगितले. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यानुसार, आता भाजपप्रणित एनडीएकडून आज (दि.9) सरकार स्थापन केले जाणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवन येथे त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकाचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार मंत्रिमंडळात भाजपाचे एकूण 18 मंत्री असणार आहेत. तर एनडीए घटक पक्षांना एकूण 18 मंत्रिपदे दिली जाणार आहेत. त्यात सात कॅबिनेट तर 11 राज्यमंत्री पदाचा समावेश असणार आहे.






Source link