MHADA Mumbai lottery 2024: म्हाडा मुंबईच्या लॉटरीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद, २,०३० घरांसाठी आले इतक्या संख्येने अर्ज

0
1
MHADA Mumbai lottery 2024: म्हाडा मुंबईच्या लॉटरीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद, २,०३० घरांसाठी आले इतक्या संख्येने अर्ज


म्हाडा मुंबई मंडळाकडून २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आजसोडत जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर, विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील २०३० सदनिका विक्रीसाठी तयार आहेत. यासाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ०९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरूवात होणार आहे. या सोडतीची जाहिरात ०८ ऑगस्ट, २०२४ रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रात येणार आहे. तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.



Source link