
मेक्सिकोमध्ये पुन्हा एकदा बसचा अपघात झाला. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे.
रविवारी पहाटे मेक्सिकोमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला होता. दक्षिण मेक्सिकोमध्ये ट्रक उलटून 10 जणांचा मृत्यू झाला होता. आता मेक्सिकोमध्ये पुन्हा एकदा मोठा रस्ता अपघात (Maxico Bus Accident) झाला आहे. मेक्सिकोमध्ये स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी पहाटे बस उलटलून (Bus overturned) अपघात झाला. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. अपघाताचं कारण अद्याप समजून शकलेलं नाही आहे. मृतांपैकी बहुतांश प्रवाशांचा समावेश आहे.
हे सुद्धा वाचा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओक्साका राज्याच्या ऍटर्नी जनरलने सांगितले की, सर्व मृत व्हेनेझुएला आणि हैतीचे रहिवासी आहेत. या अपघातात सुमारे 27 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.







