
हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक कालावधी –
मेगाब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहणार आहे. सीएसएमटी येथून वांद्रे, गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहणार आहे. तर, पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीकरता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहिल. मेगाब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष लोकलसेवा २० मिनिटांनी चालवण्यात येतील.