
केंद्रीयमंत्री मीनाक्षी लेखी यांनी ‘भारत माता की जय’ बोलण्यास नकार देणाऱ्या केरळच्या नागरिकांवर संताप व्यक्त केला आहे. त्या कोझिकोड येथील एका युवा संमेलनात संबोधित करत होत्या.
कोझिकोड : केंद्रीयमंत्री मीनाक्षी लेखी यांनी ‘भारत माता की जय’ बोलण्यास नकार देणाऱ्या केरळच्या नागरिकांवर संताप व्यक्त केला आहे. त्या कोझिकोड येथील एका युवा संमेलनात संबोधित करत होत्या. या संमेलनात त्यांनी ‘भारत माता की जय’ची घोषणा देण्यास सांगितले असता गर्दीतील काही लोकांनी घोषणा देण्यास नकार दिला. यामुळे मीनाक्षी लेखी चांगल्याच संतापल्या.
‘भारत माता की जय’ बोलण्यास नकार देणाऱ्या जनतेला विचारले की, भारत तुमची आई नाही का? तसेच, त्यांनी घोषणाबाजी करण्यास नकार दिलेल्या एका महिलेला कार्यक्रमस्थळातून निघून जाण्याचीही सूचना केली. या संमेलनाचे आयोजन दक्षिणपंथी संघटनेने केले होते.








