
फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार पेठ परिसरात आज राजकीय वातावरण रंगतदार झाले. प्रभाग क्र. 2 (अनुसूचित जाती महिला) राखीव या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट (महायुती) यांच्या उमेदवार म्हणून सौ. मीना जीवन काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभाग दोन मधून काकडे कुटुंबाला संधी मिळावी अशी स्थानिकांची मागणी होती, आणि अखेर ती पूर्ण झाल्याने प्रभाग मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अर्ज दाखल करताना सौ. मीना काकडे यांनी पक्षाच्या अधिकृत चिन्हावर उमेदवारी दाखल केली असून त्यावेळी कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. प्रभागातील नागरिकांच्या समस्या, मूलभूत सुविधांचा अभाव आणि स्थानिक प्रश्न यावर प्रभावीपणे काम करून सक्षम नेतृत्व देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.








