
सध्या सोशल मीडियावर ‘मोये मोये’ या सर्बियन गाण्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या गाण्याचे बोले अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. हा ट्रेंड टिकटॉकमुळे सेट झाला आहे. कारण अनेक टीकटॉकर्सनी डझनम गाण्यातील ‘मोये मोये’ हा एक भाग घेऊन त्यावर त्यांना आवडतील तसे व्हिडीओ बनवून शेअर केले. हे व्हिडीओ इतके व्हायरल झाले की सध्या फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्रामवर केवळ या गाण्याची क्रेझ पाहायला मिळते. पण या शब्दांचा अर्थ काय? असा प्रश्न मात्र सर्वांना पडला आहे.







