Marathi Natak: ‘आपण यांना पाहिलंत का?’ धमाल नाटक लवकरच रंगभूमीवर

0
16
Marathi Natak: ‘आपण यांना पाहिलंत का?’ धमाल नाटक लवकरच रंगभूमीवर


या नाटकाची निर्मिती आदिती देवेंद्र राव, वैशाली धनेश पोतदार यांनी केली आहे. सुशील स्वामी यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. वैवाहिक आयुष्याची बरीच वर्षेसोबत काढल्यावर नवरा बायको नकळतपणे एकमेकांना ग्राह्य धरू लागतात. ते सुखी तर असतात, पण त्यांच्या संसारात पोकळी नेहमी जाणवत राहत असते, ती पोकळी कोणी एक व्यक्ती भरून काढतं, ती व्यक्ती त्या जोडप्यांच्या संसारात कधी कधी दिसते, तर कधी नाही दिसत, पण त्या व्यक्तीच्या असण्याने जो संसार कंटाळवाणा झालाले आहे तो अचनाकपणे ताजातवाना होतो. त्याच्या येण्याने जी काही गंमत संसारात होऊ शकते ती सर्व गंमत ‘आपण यांना पाहिलंत का?’ या नाटकामध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.



Source link