
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपण उपोषण सोडायला तयार आहे. शिष्टमंडळाने दिलेल्या आश्वासनावर बोलताना मनोज जरांगे यांनी सांगितलं की, आपण सकारात्म असून जर सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल आणि आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार असाल तर आपण राज्य सरकारला वेळ देण्यास तयार आहे. मात्र ही वाढवून दिलेली वेळ शेवटचीच असेल.






