
youth ended his life for maratha reservation: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. जागोजागी या साठी आंदोलने होत आहे. या सोबतच आरक्षण मिळावे या साठी अनेक तरुण आपले जीवन संपवत आहेत. या साठी मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन करून देखील या घटना थांबतांना दिसत नाही. अशीच एक घटना संभाजी नगर येथील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथे घडली असून एका तरुणाने छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोरच विष पिऊन आपले जीवन संपवले आहे. ही घटना बुधवारी (दि १३) चार वाजता घडली.






