Maratha Reservation : मराठ्यांचं १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..

0
22
Maratha Reservation : मराठ्यांचं १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..


मराठा समाजाला आधी दिलेलं १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसं आलं यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, सर्वात आधी मराठा समाजाला पृथ्वीराज चव्हाण सरकारने १६ टक्के आरक्षण दिलं होतं. ते न्यायालयाने नाकारलं. मग मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिलं. तेही न्यायालयात टिकलं नाही. न्यायालयाने त्यावर आक्षेप घेत शिक्षणात १२ टक्के आणि नोकरीत १३ टक्क्यांवर आणलं. मात्र आता राज्य मागास आयोगाने जे निकष दिले, त्या निकषानुसार पाहणी केली, त्या पाहणीच्या निष्कर्षातून आजचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. आरक्षणाची टक्केवारी ठरविताना ही खबरदारी घ्यावी लागते, असे फडणवीस म्हणाले. 



Source link