Manoj Jarange Patil : मनोज जरांगेनी वाढवलं टेन्शन! ‘या’ ठिकाणचे उमेदवार पाडणार, स्वत: पाटील यांनी सांगितली यादी

0
17
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेनी वाढवलं टेन्शन! ‘या’ ठिकाणचे उमेदवार पाडणार, स्वत: पाटील यांनी सांगितली यादी


Manoj Jarange Patil : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उद्या अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. तर २० तारखेला मतदान होणार आहे. आणि २३ तारखेला निकाल लागणार आहे. एकीकडे बंडखोरांनी महायुती व महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली असतांना आता मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी देखील टेन्शन वाढवलं आहे. जरांगे पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीत कुणाला पाडणार आणि कुणाविरोधात लढणार या मतदारसंघाची थेट नावं जाहीर केली आहे. पाटील यांनी दिलेल्या यादीत काही ठिकाणी महायुतीचे तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यानं दोन्ही आघाड्यांची धाकधूक वाढली आहे.



Source link