
मल्लिका तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत होती. ‘डर्टी पॉलिटिक्स’मधील एका इंटिमेट सीनवरून अभिनेत्रीचा ओम पुरीसोबत वाद झाला होता. मल्लिका ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री होती, जिला प्लेबॉय मासिकाच्या कव्हर पेजवर दिसण्याची संधी मिळाली होती. यासाठी तिला न्यूड शूट करावे लागणार होते. मात्र, तिने यासाठी थेट नकार दिला. मल्लिका शेरावत हिने हिंदीशिवाय इंग्रजी आणि चायनीज चित्रपटांमध्येही काम केले आहे. इतकेच नाही तर, मल्लिकाने आंतरराष्ट्रीय स्टार जॅकी चॅनसोबतही काम केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मल्लिका एअर होस्टेस म्हणून काम करत असताना पायलट करण गिल सिंहच्या प्रेमात पडली होती. त्या दोघांचे लग्नही झाले होते. मात्र, वर्षभरातच दोघांनी घटस्फोट घेतला.








