
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मंत्र्यांना मालदीव सरकारने बडतर्फ केल्यानंतरही या टीकेचे पडसाद उमटत आहेत. या एका घटनेमुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय कंपन्याही आता मालदीवच्या विरोधात उतरल्या आहेत. तसेच बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.








