
मलायका अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी अर्जुन कपूर सलमान खानची बहीण अर्पिता खानसोबत रिलेशनशिपमध्ये होता, असे म्हटले जाते. या काळात अर्जुन कपूर सतत सलमान खानच्या घरी जा-ये करत होता. मात्र, काही वेळातच अर्जुन आणि अर्पिताचे ब्रेकअप झाले. यानंतरही अर्जुनचे सलमानच्या घरी जाणे सुरूच होते. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याबाबत तो सलमान खानकडून सल्ला घ्यायचा. मात्र, त्या दरम्यान त्याचे मलायकाशी फार संबंध नव्हते.








