
१२ जून रोजी, मालाडचा रहिवासी ऑर्लेम ब्रेंडन सेराओ (वय २६) व त्याच्या बहिणीने ऑनलाइन ऑर्डर केलेले Yummo कंपनीचे बटरस्कॉच आईस्क्रीम खात असताना आइस्क्रीम कोनमध्ये मानवी बोट सापडले होते. यानंतर सेराओने सुरुवातीला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आईस्क्रीम कंपनीकडे तक्रार नोंदवली पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने मालाड पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी तपास करत पुण्यातील फॉर्च्युन डेयरी प्रकल्पापर्यंत पोहोचले. याच कंपनीत उत्पादन प्रक्रियेदरम्यान पोटे यांचे बोट कापले होते. दरम्यान, पोलिसांनी या बोटाचे व पोटे यांच्या डीएनए नमुने घेऊन टे फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवले होते. हे बोट कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आले असून, यम्मो आइस्क्रीम कंपनीच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





