
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मालाड पूर्व येथील दिंडोशी येथील व्यावसायिक इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील गारमेन्टच्या दुकानाला आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आग लागली. इमारतीच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर धुराचे लोट पसरल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब अग्निशमनदलाला याबाबत माहिती दिली. यानंतर अग्निशमनदलाच्या ८ गाड्या घटना घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलाला यश आले असून या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.







