फलटण प्रतिनिधी उमेश काकडे:सध्या फलटण परिसरात सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फलटण उपविभाग अंतर्गत येणारे काही प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे रस्ते तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांना पत्राद्वारे याबाबत माहिती दिली आहे. पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की, संबंधित ठिकाणी प्रतिबंधक फलक व अडथळे लावण्यात आले असून नागरिकांना याबाबत पूर्वसूचना देण्यात आलेली आहे.
या रस्त्यांची सविस्तर यादी संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्यात आली असून, सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तहसीलदार फलटण यांनाही सदर बाबत माहिती देण्यात आली आहे.