
Pankaj Tripathi movie: बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेता पंकज त्रिपाठीचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘मैं अटल हूं’ काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता पंकज त्रिपाठीने देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये पाहाता आला नाही त्यांना आता घरबसल्या पाहाता येणार आहे. हो तुम्ही बरोबर ऐकले, ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.






