
सध्या महेश बाबू त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. महेश बाबू दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांच्यासोबत ‘गुंटूर करम’ नावाच्या आगामी चित्रपटात काम करत आहेत. कलाकार, क्रू, क्रिएटिव्ह मतभेद आणि इतर अनेक कारणांमुळे हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री पूजा हेगडे आणि संगीतकार एस थमन यांनी या चित्रपटातून आता काढता पाय घेतला आहे. मात्र, अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शूटिंग, स्क्रिप्ट आणि बऱ्याच काही गोष्टी बदलल्यामुळे पूजा हेगडेने हा चित्रपट सोडल्याचे समोर येत आहे.आता या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून संयुक्ता आणि मीनाक्षी चौधरी यांच्या नावांचा विचार केला जात आहे.







