प्रभाग २ मध्ये महायुतीचा दमदार प्रचार सुरू; मिना काकडे व सूपर्णा अहिवळे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात”

0
38
प्रभाग २ मध्ये महायुतीचा दमदार प्रचार सुरू; मिना काकडे व सूपर्णा अहिवळे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात”

फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार पेठ परिसरात महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराची गती वाढवली आहे. प्रभाग क्रमांक 2 आणि 3 मधील अधिकृत उमेदवारांसाठी मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी शनिवार, दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता विशेष पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रचार दौऱ्याचे नेतृत्व सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर करणार आहेत.

मंगळवार पेठ येथे आयोजित या प्रचार उपक्रमात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. प्रभाग क्रमांक 2 च्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. मीना जीवन काकडे आणि सौ. सुपर्णा सनी अहिवळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. समशेर नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरण, रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच मूलभूत सुविधांवर मतदारांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

या भेटीमुळे प्रभागातील राजकीय वातावरण अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांमध्येही चर्चांना उधाण आले आहे.