फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचा निर्धार, सचिन पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन

0
1
फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचा निर्धार, सचिन पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन

फलटण – फलटण शहरात राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेस फलटणकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी अल्पावधीत केलेल्या पाणी, रेल्वे, एमआयडीसी आणि रस्ते विकास कामांमुळे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सचिन कांबळे पाटील निश्चितपणे विजयी होतील, असा विश्वास अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.

महायुतीचे शक्तिप्रदर्शन
अहिल्यानगर येथील स्वामी समर्थ मंदिरात शुभारंभ करून निघालेल्या या पदयात्रेत अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदिप चोरमले, माजी नगरसेवक अजय माळवे, अनुप शहा, अमोल सस्ते, युवराज पवार, रणजितसिंह भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. अॅड. जिजामाला यांनी आवाहन केले की, फलटणकरांनी महायुतीच्या सचिन पाटील यांना विधानसभेत विजय मिळवून, आमदारपदी विराजमान करण्यासाठी त्यांना मतांचा कौल द्यावा.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि संकल्प
या रॅलीत माजी नगरसेवक, झाकिरभाई मणेर, फिरोज आतार, आण्णा घार्गे, आबा बेंद्रे, संजय चिटणीस, राहुल पवार आदींसह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.