
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा मंच रसिकांना निखळ आनंद देत असून हास्यजत्रेतील एकेक व्यक्तिरेखा रसिकांना त्यांच्या घरातली वाटते. आता हे मनोरंजन ३ एप्रिलपासून प्रत्येक आठवड्यात चार दिवस होणार आहे, म्हणजेच आता प्रेक्षकांसाठी हास्याचा चौकार घेऊन येतो आहोत. आता नवनवीन प्रहसनांतून काही वेगळेपण अनुभवायला मिळणार आहे आणि यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. निवेदिका प्राजक्ता माळी हिची उत्स्फूर्त दाद, हास्यरसिक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांचं मार्मिक परीक्षण तर समीर, गौरव, नम्रता, प्रसाद, चेतना, शिवली, पृथ्वीक, ओंकार, दत्तू आणि इतर कलाकार यांचे दमदार अभिनय ह्यांमुळे निखळ मनोरंजन होतं. टेन्शन विसरण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी आणि मनमुराद हसण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पाहिला जातो.








