Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट, कोकणातही वरुणराजा बसरणार

0
18
Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट, कोकणातही वरुणराजा बसरणार


कोकण आणि विदर्भासह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील पाच दिवस म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत पुणे शहर तसेच पश्चिम महाराष्ट्रात हलका ते अतिहलका प्रमाणात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.



Source link