[ad_1]
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज २२ जून रोजी नैऋत्य मोसमी पावसाने विदर्भाचा उर्वरित भाग, मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड, ओडीसाचा आणखी काही भाग व्यापला आहे. पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातील देखील मॉन्सूनने प्रगती केली आहे. तर पश्चिम बंगालमधील उपहिमालयीन पर्वतरांगांचा उर्वरित भाग व झारखंडच्या काही भाग मॉन्सूनने व्यापला आहे. उत्तरी सीमा अरबी समुद्रातील २०.५ उत्तर अक्षांश नवसारी, जळगाव, मांडला, पेंढरा रोड, जरसुगडा. बालासूर, हलदीया, कपूर, साहेब गंज आणि रॉकसल चक्रिय स्थिती असल्याने, तसेच त्याची वाटचाल ही येत्या तीन-चार दिवसात उत्तर अरबी समुद्रचा आणखी काही भाग, गुजरात महाराष्ट्राचा उर्वरित भाग, मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा पश्चिम बंगालमधील गंगेच्या खोऱ्याचा प्रदेश, झारखंड बिहारचा आणखी काही भाग, तर पूर्व उत्तर प्रदेशात काही भागात वाटचाल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
[ad_2]
Source link
