Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

0
18
Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, हवामान खात्याकडून मोठी अपडेट


पुढील चार ते पाच दिवसांत राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, अकोला, अमरावती आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. दोन्ही विभागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. याशिवाय मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



Source link