Maharashtra weather update : राज्यात पावसाचा जोर वाढणार! कोकण, मुंबई, पुण्यासाठी IMD चा महत्वाचा इशारा!

0
22
Maharashtra weather update : राज्यात पावसाचा जोर वाढणार! कोकण, मुंबई, पुण्यासाठी IMD चा महत्वाचा इशारा!


Maharashtra weather update : राज्यात मॉन्सूनचा जोर वाढणार आहे. पुढील काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. तर मुंबई आणि पुण्याच्या घाट विभागात देखील मुळसाधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पाच जुलैपर्यंत ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, कोल्हापूर, सातारा येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना ५ जुलैपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे.



Source link