
Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट आली असून याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे. तापमानात थोडी वाढ झाली असली तरी थंडीचा कडाका कायम आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत गारठा वाढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात वाहणाऱ्या थंड वाऱ्यांची तीव्रता वाढली आहे. त्यामुळं मध्य भारतापर्यंत गारठा वाढला आहे. तर पूर्वोत्तर राज्यांमध्येही किमान तापमानाच घट होऊन काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात गुरुवारी अहिल्यानगरचे तापमान सर्वात कमी होते. या ठिकाणी ७.५ डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.




