Maharashtra Shahir: बाळासाहेब ठाकरे ते साने गुरुजी; ‘महाराष्ट्र शाहीर’च्या टीझरमध्ये दिसली दिग्गज नेत्यांची झलक!

0
5
Maharashtra Shahir: बाळासाहेब ठाकरे ते साने गुरुजी; ‘महाराष्ट्र शाहीर’च्या टीझरमध्ये दिसली दिग्गज नेत्यांची झलक!


‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी असे दिग्गज पडद्यावर अवतरतात. त्यांची प्रहसने पार्श्वभूमीवर येतात. ‘कृष्णराव गणपतराव साबळे! हा असा आवाज कधीच ऐकला नव्हता, पंचामृतासारखा!’,’तुमचा पिंड कलावंताचा. तुम्ही एकाचवेळी अनेकांना जागवू शकता.’ ‘आमची भिस्त तुमच्यावर आहे, कारण जनतेची नाडी तुम्हाला कळली आहे’, अशी गौरवगाथा या दिग्गजांच्या तोंडी येते आणि त्यानंतर साने गुरुजींची थाप पाठीवर पडते, ‘तू नुसता गात नाहीस कृष्णा, शाहीर आहेस शाहीर!’ येळकोट येळकोट जय मल्हार, जेजुरीच्या खंडेराया जागराला या या, आगंगंगं इंचू चावला… अशी विविध प्रकारातील शाहिरांनी गायलेली गाणी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजय-अतुल या संगीतकार जोडीने शाहिरांच्या संगीत कारकिर्दीला पूर्ण न्याय दिला आहे. त्यांची ही विविधांगी गाणी पडद्यावर रसिकांसाठी एक आगळी पर्वणीच ठरणार आहे.



Source link