maharashtra election results Live : महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला, आठ वाजता सुरू होणार निवडणुकीची मतमोजणी

0
1
maharashtra election results Live : महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला, आठ वाजता सुरू होणार निवडणुकीची मतमोजणी


महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला, आठ वाजता सुरू होणार निवडणुकीची मतमोजणी

महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला, आठ वाजता सुरू होणार निवडणुकीची मतमोजणी
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. इथे पाहा पक्ष आणि मतदारसंघनिहाय निकालाचे अपडेट्स

Sat, 23 Nov 202402:29 AM IST

थोड्याच वेळात सुरू होणार मतदान; आधी पोस्टल मतांची होणार मतमोजणी 

Maharashtra Election Result 2024 Live: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू करेल. पोस्टल मतपत्रिका आधी मोजल्या जातील. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) उघडली जातील. राज्यातील एकूण विधानसभा मतदारसंघाची संख्या २८८ आहे.

थोड्याच वेळात सुरू होणार मतदान; आधी पोस्टल मतांची होणार मतमोजणी

थोड्याच वेळात सुरू होणार मतदान; आधी पोस्टल मतांची होणार मतमोजणी

Sat, 23 Nov 202402:25 AM IST

ठाकरेंच्या शिवसेनेचे शिंदे गटावर आरोप

Maharashtra Election Result: ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा जागेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार केदार दिघे यांनी शुक्रवारी मतदानोत्तर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप केला, ज्यामध्ये मतदान साहित्य निरीक्षण कक्षात ठेवण्या ऐवजी ‘स्ट्राँग रूम’मध्ये ठेवण्यात आले होते. दिघे म्हणाले, ‘पोस्टल बॅलेट असलेल्या लिफाफ्यांना सीलबंद केले नव्हते. निवडणूक आयोगाने या गैरप्रकारांची चौकशी करून कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. त्यांनी त्या जागेवर फेरमतदान घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Sat, 23 Nov 202402:25 AM IST

राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा रंगला राजकीय सामना

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील राजकीय लढत प्रामुख्याने सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्यात आहे. एकीकडे, महाआघाडीत भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT), ज्येष्ठ नेते शरद पवार यांची NCP (SP) आणि काँग्रेस हे आहेत.

Sat, 23 Nov 202402:22 AM IST

महाविकास आघाडीचा आमदारांवर राहणार वॉच

Maharashtra Election Result : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदार फुटू नये याची काळजी घेतली आहे. सर्व आमदारांवर वॉच ठेवला जाणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी सांगितले की, महाविकास आघाडी (एमव्हीए) च्या घटक पक्षांनी महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना एकत्र ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार स्थापनेपूर्वी आमदार फूटीचा कोणताही प्रयत्न हाणून पाडणे हा या पाऊलाचा उद्देश आहे, असे राऊत म्हणाले.

Sat, 23 Nov 202402:20 AM IST

महाराष्ट्रातील २०१९ च्या निवडणुका झाल्या होत्या चुरशीच्या

Maharashtra Election Result : २०१९ मध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. मात्र, शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून फुट पडल्याने महायुतीत दुभंगली होती. त्यामुळे शिवसेनेने महाविकास आघाडीत सहभागी होत सरकार स्थापन केलं. मात्र, काही वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. यामुळे शिवसेनेत फुट पडून पक्ष दोन गटात विभागला गेला. एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ देत मुख्यमंत्री पदाची शपथ घेत भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडलं.

Sat, 23 Nov 202402:13 AM IST

महाविकास आघाडीचा १६० हून अधिक जागांवर विजयाचा दावा

Maharashtra Election Result: महाविकास आघाडीच्या नेत्यांनी १६० पेक्षा जागा जिंकण्याचा विश्वास वर्तवला आहे. शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी २८८ पैकी १६० ते १६५ जागा महाविकास आघाडी जिंकेल आणि राज्यात स्थिर सरकार देईल, असा विश्वास व्यक्त केला. राऊत पत्रकारांना म्हणाले, ‘आम्ही आणि आमचे मित्र पक्ष, शेकाप, समाजवादी पक्ष, डावे पक्ष यासारख्या छोट्या पक्षांसह बहुमताचा आकडा पार करत आहोत. आम्ही १६०-१६५ जागा जिंकणार आहोत. राज्यात स्थिर सरकार येईल. हे मी मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो.

Sat, 23 Nov 202402:10 AM IST

सुषमा अंधारेंनी ट्विट करत मुख्यमंत्री शिंदेंना त्यांच्या वक्तव्याची करून दिली आठवण

Maharashtra Election Result: सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या त्यांच्या जुन्या व्यक्तव्याबद्दल आठवण करून दिली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ट्विट केले आहे. या त्यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत असलेल्या ५० आमदारांपैकी एकही जण पडणार नाही, तसे झाल्यास मी राजकारण सोडेन असं म्हटलं होतं. याच वक्तव्याची सुषमा अंधारे यांनी आठवण करून दिली आहे.

Sat, 23 Nov 202401:55 AM IST

Maharashtra Election 2024 results : राज्यातील मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर

राज्यातील सर्व मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. मतमोजणी केंद्रातील सर्व कार्यवाही कव्हर केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सर्व केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा कवच असेल.

Sat, 23 Nov 202401:51 AM IST

Maharashtra Election results 2024 : राज्यात एकूण २८८ मतमोजणी केंद्रे

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी २८८ मतमोजणी केंद्रे असून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी १ मतमोजणी केंद्र असेल.

Sat, 23 Nov 202401:53 AM IST

Maharashtra Election results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी

महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मशिनमधील मतदानाची मोजणी होईल.





Source link