
‘पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यापासून दोन वेळा अशोक चव्हाण पत्रकारांशी बोलले. मात्र आपण काँग्रेस का सोडतोय हे त्यांनी सांगितलं नाही. नांदेडमधील महापौर, नगरसेवक व इतर पदाधिकारी आज आम्हाला येऊन भेटले. त्यांनाही काही सांगण्याची तसदी अशोक चव्हाण यांनी घेतली नाही. राजकारणात असलेल्या व्यक्तीची ती जबाबदारी असते, पण त्यांनी ते केलं नाही. महाराष्ट्राची जनता हे अजिबात स्वीकारणार नाही,’ असं चेन्नीथला म्हणाले.





