Maharashra weather update : राज्यात पावसाचा जोर ओसरला! आज पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर ‘या’ जिल्ह्यांना IMD चा यलो अलर्ट

0
17
Maharashra weather update : राज्यात पावसाचा जोर ओसरला! आज पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर ‘या’ जिल्ह्यांना IMD चा यलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पालघर, ठाणे, मुंबईला सुद्धा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, कोल्हापूर तर विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Source link