Mahaparinirvan Din:महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीम अनुयायांचा जनसागर; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली

0
14
Mahaparinirvan Din:महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीम अनुयायांचा जनसागर; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली


Mahaparinirvan Din 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७ वा महानिर्वाण दिन असून या निमित्त हजारो भीम अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे आले आहे. या सोहळ्यासाठी मुंबई महानगर पालिकेने जय्यत तयारी केली आहे. सकाळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी जात अभिवादन केले. आज मुंबईत महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुट्टी जाहीर केली आहे. तसेच मुंबईच्या वाहतुकीत देखील मोठा बदल करण्यात आला आहे. मध्यरात्री पासून अनेक भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. येथे येणाऱ्या नागरिकांसाठी ठिक-ठिकाणी मदत कक्ष देखील उभारण्यात आले आहे.



Source link