
महाड एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीत शुक्रवारी रात्री भीषण स्फोट झाला. वायू गळतीमुळे ही दुर्घटना घडली. कंपनीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती आहे. कंपनीच्या पावडर प्लांटमध्ये हा स्फोट झाला. यानंतर आगीचे आणि धुराचे लोट उसळण्यास सुरूवात झाली. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.






