फलटणमध्ये महा रक्तदान शिबिर… खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून लोकहितासाठी मोठा उपक्रम

0
6
फलटणमध्ये महा रक्तदान शिबिर… खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून लोकहितासाठी मोठा उपक्रम

फलटण, दि. 20 जुलै 2025 (साहस Times)
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभरात महा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमांतर्गत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून एक भव्य महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबिर भारतीय जनता पक्ष व महायुती फलटण तालुका, शहर यांच्या वतीने दिनांक २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे आयोजित करण्यात आले आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या शिबिराबाबत आवाहन करताना सांगितले की, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अनेक वेळा गरजूंना वेळेवर रक्त मिळत नाही, त्यामुळे जनतेच्या सहकार्याने अशा उपक्रमांमधून रक्ताचा साठा वाढवणे हे आपले कर्तव्य आहे.”

या उपक्रमात फलटण तालुक्यातील सर्व नागरिक, भाजप व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयोजक:
महायुती, फलटण तालुका
भारतीय जनता पक्ष, फलटण शहर व तालुका

,