
आपल्या तालावर सर्वांना नाचवणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. अभिनय, सौंदर्य आणि नृत्य कौशल्याच्या जीवावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. ९०च्या दशकात माधुरी सुपरहिट अभिनेत्री होती. करिअर यशाच्या शिखरावर असताना माधुरीने १९९९ साली डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर माधुरीने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आणि ती पतीसोबत परदेशात स्थायिक झाली. मात्र परदेशात स्थायिक झालेल्या अभिनेत्रीने भारतात येण्याचा निर्णय का व कसा घेतला याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.