
तिचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट्स करत अनेकांनी आपली निराशा व्यक्त केली आहे. ‘मराठी कलाकार आहात आणि तुम्हालाच मराठी गाणी माहित नाही’, ‘ही गायिका आहे ना? गाणी गाते ना.. आणि तिला इतकं प्रसिद्ध गाणं माहीत नाही.. आता खरंच कळलं आई कुठे काय करते’, असं म्हणत नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.








