
Scientists Unlock Lung Cancer’s Deadliest Weakness : फुफ्फुसांचा कर्करोग जगभरात जलद गतीने वाढत आहे. वाढते प्रदूषण हे या आजाराचे मुख्य कारण आहे. वेळीच उपचार केल्यास या आरापासून बचाव केला जाऊ शकतो. पण या बऱ्याचदा या कर्करोगाच्या पेशी इतक्या मजबूत असतात की, उपचाराचाही काही परिणाम होत नाही. अशात आता फुफ्फुसांच्या कर्करोगाशी लढत असणाऱ्या रूग्णांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वैज्ञानिकांनी असा एक मार्ग शोधला आहे, ज्यामुळे फुफ्फुसातील ट्यमरला मुळापासून नष्ट करता येऊ शकते. या संशोधनादरम्यान त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचे प्रथिन ओळखले आहे जे फुफ्फुसात कर्करोगाच्या पेशी तयार करण्यास आणि त्यांचा बचाव करण्यास मुख्य भूमिका निभावतो. या प्रथिनाची क्रिया वेळीस थांबवली तर कर्करोगाच्या पेशी आपोआप नष्ट होऊ लागतील आणि ट्युमरचा आकारही जलद गतीने कमी होईल.
शास्त्रज्ञांना संशोधनात यश :
अमेरिकेतील एनआययू (NIU)लॅंगोग हेल्थचे शास्त्रज्ञ बराच काळ कर्करोगाच्या काही पेशी कशा प्रकारे शरिराच्या रोगप्रतिकारशक्तीला कमकुवत करून वाढत आहेत याचा अभ्यास करत होते. याच अभ्यासादरम्यान त्यांनी एक खास प्रथिने एफएसपी1 याचा (Ferroptosis Suppressor Protein 1) शोध लावला. हे प्रथिने कर्करोगाच्या पेशींचा बचाव करतात. फेरोप्टोसिस ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात शरीर अतिशय तणावात असलेल्या पेशींनी आपोआप नष्ट करते. सामान्यतः ही प्रक्रिया शरीराच्या संरक्षण यंत्रणेचा भाग असते, पण कर्करोगाच्या पेशी यापासून बचाव करत वाढत राहतात. संशोधन करताना शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम उंदरावर प्रयोग केले. या प्रयोगातून समोर आलेला निकाल शास्त्रज्ञांसाठी देखील आश्चर्यकारक होता.
प्रयोगादरम्यान उंदराच्या फुफ्फुसातील कर्करोगाच्या ट्युमरचा आकार वेगान कमी होऊ लागला. अनेक कर्करोग पेशींनी स्वतःला नष्ट करण्यास सुरूवात केली. एकूण ट्युमरचा आकार जवळजवळ सुमारे 80% पर्यंत कमी झाला. हे निकाल दर्शवतात की, एफएसपी1 या प्रथिनाला निष्क्रिय केल्याने कर्करोग पेशींना बचाव करण्यासाठी कोणताही मार्ग उरत नाही आणि त्या फेरोप्टोसच्या प्रक्रियेत अडकून नष्ट होऊ लागतात. अनेकदा फुफ्फुसांच्या एडिनोकार्सिस सारख्या कर्करोगाचा उपचार कठीण होतो कारण या पेशी सामान्य उपचारांना प्रतिकार करू लागतात. पण आता प्राप्त झालेल्या निकालावरून ज्यात कर्करोगाच्या पेशी स्वतःच नष्ट होऊ लागतात उपचाराला एक नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे.
फुप्फुसाच्या कर्करोगाविरुद्धच्या लढाईला नवीन दिशा :
जरी हे संशोधन अद्याप प्रारंभिक टप्प्यात असले आणि उंदरांवरच प्रयोग झाले असले, तरी शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की हाच सिद्धांत मानवी उपचारात सुरक्षितपणे लागू झाल्यास फुप्फुसाच्या कर्करोगाविरुद्धच्या लढाईला नवीन दिशा मिळू शकते. आता शास्त्रज्ञ एफएसपी1 थांबवणारी औषधे मानवांमध्ये किती प्रभावी आणि सुरक्षित ठरतील हे समजण्याचा प्रयत्न करत आहेत. जर हे यशस्वी झाले तर पुढील वर्षांत कर्करोग रुग्णांसाठी हे एक क्रांतिकारी पाऊल ठरू शकते.
फुफ्फुसांचा कर्करोग होऊ नये यासाठी काय काळजी घ्याल?
प्रदुषणाव्यतिरिक्त फुफ्फुसांच्या कर्करोगाचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे धूम्रपान. जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर त्वरीत बंद करा. धूम्रपान सोडल्याने कर्करोगाचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. शिवाय इतरांच्या धूम्रपानामुळे होणाऱ्या धुरामध्ये श्वास घेणे टाळा. तुमच्या घरातील रेडॉनची पातळी तपासा. रेडॉन हा एक नैसर्गिकरित्या तयार होणारा वायू आहे जो कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो. जर पातळी जास्त असेल तर कमी करण्यासाठी उपाययोजना करा. हवेची गुणवत्ता खराब असताना बाहेर जास्त वेळ घालवणे टाळा. फळे आणि भाज्या असा संतुलित आहार घ्या. निरोगी आहारामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगासह अनेक आजारांचा धोका कमी होतो. नियमित व्यायाम करा.








