
लोणवळ्यात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी ही बिबीए आणि सीएच्या च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. कल्याणी गजानन निकम असे या मुलीचे नाव आहे. ती मुलींच्या वसतिगृहात राहत होती. मात्र, तिचे काही सीनियर गेल्या दोन ते तीन महिन्यापासून तिची रॅगिंग करत होते. यात तिला बाथरूममध्ये कोंडून ठेवले जात होते. तर काही जण तिच्या पाठीमागे चाकू घेऊन धावत होते. या घटनेत तिला दोन वेळा चाकू देखील लागला आहे. यामुळे तिच्या पालकांनी वसतीगृहाच्या वॉर्डनला तक्रार देखील केली होती. मात्र, तिच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. यामुळे अखे लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, पोलिसांनी देखील कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. अखेर रॅगिंग सहन न झाल्याने कल्याणीला ब्रेन स्ट्रोक आला. सध्या तिच्यावर पिंपरी- चिंचवडमधील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.





