
Lok Sabha Elections Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल काही तासात स्पष्ट होईल. 542 जागांच्या मतमोजणीत NDA बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार भाजप सुमारे 250 जागांवर आघाडीवर आहे. याचदरम्यानन नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास कोणाचा विक्रम मोडणार यावर चर्चा सुरु आहे…
आज लोकसभेचा निकाल समोर येणार आहे. कोणते सरकार स्थापन होईल हे आज समजणार. दरम्यान लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 2024 मध्ये मोदी पुन्हा सत्तेवर आले तर पंतप्रधान मोदी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करू शकतात, जे सलग तीन वेळा निवडून आलेले भारताचे एकमेव पंतप्रधान होते.
हे सुद्धा वाचा
पंडित जवाहरलाल नेहरू 1947 ते 1964 अशी 17 वर्षे पंतप्रधान होते. लोकसभेच्या वेबसाइटवरती असलेल्या माहितीनुसार, ते देशातील सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदी राहिलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 1957 च्या लोकसभा निवडणुकीत एकट्या काँग्रेसने 371 जागा जिंकल्या होत्या, जेव्हा नेहरू 1951 मध्ये पहिल्या निवडणुकांनंतर सत्तेत परतले होते.










