
Odisha Assembly election results 2024 : ओडिसा विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच भाजप विजयी होताना दिसत आहे. निवडणूक निकालांचे कल पाहता भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
लोकसभा निवडणूक 2024 ची निवडणूकीची अर्धी मतमोजणी जवळपास पूर्ण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातचं आंध्र प्रदेश आणि ओडिसा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुद्धा होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजप्रणित एनडीए आणि कॉंग्रेसप्रणित इंडिया आघाडीमध्ये चुरशीची लढत होत आहे. आता आलेल्या कलानुसार, एनडीए 300 चा टप्पा गाठण्याचा जवळ आहे. तर इंडिया आघाडीने आतापर्यंत 229 जागांवर आघाडी मिळवली आहे.
एकंदरित ओडिसा विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच भाजप विजयी होताना दिसत आहे. निवडणूक निकालांचे कल पाहता भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर बिजू जनता दल पराभवाच्या दिशेने जात आहे. ट्रेंडचे परिणामांमध्ये रुपांतर झाल्यास, ओडिसात भाजप पहिल्यांदाच सरकार स्थापन करेल.










