Lok Sabha 2024 | ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजप कार्यकर्त्याकडून तब्बल 4 कोटींची रोकड जप्त; चौकशीत ‘या’ खासदाराचं घेतलं नाव | Navarashtra (नवराष्ट्र)

0
1
Lok Sabha 2024 | ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजप कार्यकर्त्याकडून तब्बल 4 कोटींची रोकड जप्त; चौकशीत ‘या’ खासदाराचं घेतलं नाव | Navarashtra (नवराष्ट्र)


लोकसभा निवडणुकीपूर्वी चेन्नईतील तांबरम रेल्वे स्थानकावर 4 कोटी रुपयांसह तिघांना अटक करण्यात आली. यामध्ये एका भाजप कार्यकर्त्याचाही समावेश आहे. हे लोक चार बॅगमध्ये चार कोटी रुपयांची रोकड घेऊन जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

चेन्नई : लोकसभा निवडणुकीपूर्वी चेन्नईतील तांबरम रेल्वे स्थानकावर 4 कोटी रुपयांसह तिघांना अटक करण्यात आली. यामध्ये एका भाजप कार्यकर्त्याचाही समावेश आहे. हे लोक चार बॅगमध्ये चार कोटी रुपयांची रोकड घेऊन जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे तिघेही ट्रेनने तिरुनेलवेलीला जात होते. त्यानंतर भरारी पथकाने त्याला ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहे. आरोपींपैकी सतीश हा भाजपाचा कार्यकर्ता आणि एका खासगी हॉटेलचा व्यवस्थापक आहे. त्याचा भाऊ नवीन आणि चालक पेरुमल रोख घेऊन जात होते. सूत्रांचे म्हणणे आहे की, सतीशने तिरुनेलवेली भाजपचे खासदार उमेदवार नैनार नागेन्टिरन यांच्या सूचनेनुसार रोख घेऊन जात असल्याची कबुली दिली आहे.






Source link