
LK Advani Reaction : माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी भारतरत्न मिळाल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की मी ज्या आदर्श आणि तत्त्वांचे पालन करण्याचा प्रयत्न केला त्या आदर्शांचा आणि तत्त्वांचा हा सम्मान आहे.
LK Advani On Bharat Ratna : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (3 फेब्रुवारी) भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली. यावर माजी उपपंतप्रधान अडवाणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा केवळ एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठीच नव्हे, तर मी ज्या आदर्श आणि तत्त्वांचे पालन करण्याचा प्रयत्न केला त्याचाही हा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
लालकृष्ण अडवाणींनी निवेदनाद्वारे दिली प्रतिक्रिया










