Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रसमलैंगिक जोडप्यांच्या हक्कांसाठी 'राईट टू लव्ह'च्या माध्यमातून लिव्ह-इन करार: प्रेमाचा हक्क

समलैंगिक जोडप्यांच्या हक्कांसाठी ‘राईट टू लव्ह’च्या माध्यमातून लिव्ह-इन करार: प्रेमाचा हक्क

पुणे प्रतिनिधी: अनहद सोशल फाऊंडेशनच्या ‘राईट टू लव्ह’ उपक्रमांतर्गत आणखी एका समलैंगिक जोडप्याचा लिव्ह-इन रिलेशनशिप करार करण्यात आला आहे. या करारामुळे या जोडप्याच्या नात्याला कायदेशीर आधार मिळाला असून, ते आता सन्मानाने व सुरक्षितपणे आपले नाते जगू शकतात, अशी माहिती ‘राईट टू लव्ह’चे संचालक के. अभिजीत यांनी दिली.

के. अभिजीत म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून ‘राईट टू लव्ह’ उपक्रमाद्वारे अनेक समलैंगिक जोडप्यांच्या केसेस हाताळल्या आहेत. त्यातून समलैंगिक जोडप्यांना कायदेशीर आधार व सुरक्षितता देण्याचे कार्य यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले आहे. आज झालेला हा लिव्ह-इन करार ‘राईट टू लव्ह’चा तिसरा यशस्वी करार असून, आधीच्या जोडप्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठा पाठिंबा दिला.”

‘राईट टू लव्ह’ हा अनहद सोशल फाऊंडेशनचा उपक्रम असून त्याचे उद्दिष्ट प्रत्येक व्यक्तीला प्रेमाचा आणि जोडीदार निवडीचा हक्क मिळावा हे आहे. गेली ९ वर्षे हा उपक्रम जात, धर्म, लिंग, वर्ग भेद दूर ठेवून सर्वांना त्यांच्या इच्छेनुसार जोडीदार निवडण्याचा हक्क देण्यासाठी कार्यरत आहे. या नव्या करारामुळे समलैंगिक जोडप्यांच्या हक्कांसाठी एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. ‘राईट टू लव्ह’च्या वतीने प्रत्येक जोडप्याला सन्मानाने आणि सुरक्षिततेने त्यांचे नाते जगता यावे यासाठी फाऊंडेशन सदैव कार्यरत राहणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments